आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:सेनगावात विज कंपनीच्या अभियंत्यावर अचारसंहिता भंगाचा गुन्हा, भाजपा उमेदवाराच्या समर्थनार्थ पोस्ट करणे भोवले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीच्यावेळी भाजपा उमेदवाराच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर पोस्ट टाकणे विज कंपनीच्या अभियंत्याच्या अंगलट आले असून या प्रकरणात सेनगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 4 आदर्श अचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सेनगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 पैकी 13 प्रभागाची निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी उमेदवार व समर्थकांनी जोरदार प्रचार चालविला होता. कॉर्नर बैठकांसोबतच सोशल मिडीयावर देखील प्रचार केला जात होता. यावेळी सेनगाव विज कंपनीचे सहाय्यक अभियंता सत्यानारायण वडगावकर यांनी सोशल मिडीयावर भाजपा उमेदवार गजानन घोगरे यांच्या समार्थनार्थ पोस्ट टाकली होती. सदर प्रकार (ता. 15 डिसेंबर रोजी स्पष्ट झाला होता.

यावर इतर राजकिय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवित सहाय्यक अभियंता वडगावकर यांच्या विरुद्ध निवडणुक विभागाकडे तक्रारही दाखल करून चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यावरून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज गटविकास अधिकारी सखाराम बेले यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अभियंता सत्यनारायण वडगावकर याच्या विरुध्द शासकिय पदाचा गैरवापर करणे तसेच आदर्श अचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक राठोड पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...