आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हिंगोलीत पालिकेने विद्युत बचतीसाठी बसवली सेंट्रलाईज कंट्रोल मॉनिटरींग सिस्टीम, पथदिवे ठरलेल्या वेळेत सुरु अन बंद होणार, राज्यातील पहिली पालिका

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पथदिवे स्वयंचलीत सुरु व बंद होणार

हिंगोलीत पथदिव्यांच्या वीज व देयकांच्या बचतीसाठी पालिकेने सेंट्रलाईज कंट्रोल मॉनिटरींग सिस्टीम बसविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत पथदिवे सुरु अन बंद होणार आहेत. त्यातून विजेची बचत होऊन देयकातही मोठी कपात होणार आहे. अशा प्रकारची यंत्रणा बसवणारी हिंगोली पालिका राज्यातील पहिलीच नगर पालिका आहे.

हिंगोली शहरात पालिकेकडून सहा हजार ठिकाणी एलईडी पथदिवे बसवले आहेत. त्यासाठी वीज कंपनीकडून १८० विद्युत मिटर घेण्यात आले आहेत. पथदिव्यांसाठी विजेच्या वापरापोटी पालिकेला दर महिन्याला ५.५० लाख रुपयांचे देयक दिले जात होते. सायंकाळी साडेसहा वाजता पथदिवे सुरु केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पथदिवे बंद कण्यासाठी प्रत्येक मिटरवर जावे लागत होते. त्यामुळे सकाळी आठ वाजेपर्यंत पथदिवे सुरु राहात होते. त्यातून विजेचा वापर वाढल्याचे दिसू लागले होते. तर वीज कंपनीचे अनेक मिटर बंद असल्यानंतही वीज कंपनीकडून सरासरी देयक दिले जात होते. त्याचा भुर्दंडही पालिकेला सहन करावा लागत होता. तर मार्च महिन्यात थकबाकी वसुलीचे कारण पुढे करून वीज कंपनीकडून पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जात होता.

दरम्यान, एलईडी पथदिवे बसविल्यानंतरही वीज देयक कायम असल्याने पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी पथदिव्यांच्या मिटरच्या ठिकाणी सेंट्रलाईज कंट्रोल मॉनिटरींग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला. त्यास नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह नगरसेवकांनीही सहमती दिली.

त्यानुसार मुंबई येथील ईएसएसएल कंपनीसोबत चर्चा करून सात वर्षाचा करार करण्यात आला. त्यानुसार या कंपनीकडून प्रत्येक मिटरवर हि यंत्रणा बसविण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी ता. २५ पालिके समोरील मिटरवर हि यंत्रणा बसविण्यात आली आहे. यावेळी मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे, अभियंता रत्नाकर अडशिरे, शाम माळवटकर, विद्युत अभियंता वसंत पुतळे, गजानन हिरेमठ, भिमचरण मगरे, चंदू लव्हाळे यांची उपस्थिती होती. पुढील काही दिवसांतच सर्व मिटर जवळ हि यंत्रणा बसविली जाणार आहे. राज्यात अशा प्रकारची यंत्रणा बसवणारी हिंगोली पालिका राज्यातील पाहिलीच पालिका आहे.

पथदिवे स्वयंचलीत सुरु व बंद होणार

यामध्ये कंपनीकडून बसविण्यात आलेल्या यंत्रामध्ये पथदिवे कधी सुरु करायचे अन कधी बंद करायचे याची वेळ निश्‍चित करता येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता पथदिवे सुरु होतील अन सकाळी साडेसहा वाजता बंद होतील. त्यामुळे कर्मचाऱ्याद्वारे पथदिवे सुरु बंद करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असून त्यातून विजेची बचत होईल. या शिवाय प्रत्येक ऋतूमध्ये हि वेळ बदलता येणार आहे.

विज वापरातील तफावत स्पष्ट होईल ः डॉ. अजय कुरवाडे, पालिका मुख्याधिकारी हिंगोली

या यंत्रामध्येच स्वतंत्र विद्युत मीटर आहे. त्यामुळे वीज कंपनीने बसवलेले विद्युत मीटर व यंत्रातील विद्युत मीटरमध्ये नेमके किती युनीट वीज वापर झाला हे स्पष्ट होईल. त्यातून बरेच वेळा वीज वापराच्या युनीटमध्ये येणारी तफावत दुर होईल. शिवाय विद्युत देयकांमध्ये किमान तीस ते चाळीस टक्के बचत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...