आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली खून:नांदूसा येथे 12 वर्षीय मुलीची ब्लेडने गळा चिरून हत्या; घरात एकटी असतानाच घुसला होता अज्ञात हल्लेखोर

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कुटुंबीय शेतात काम करण्यासाठी गेले असताना घरात घुसला होता हल्लेखोर

हिंगोलीतील नांदूसा येथे एका अवघ्या 12 वर्षीय मुलीची धारदार ब्लेडने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांनी बोलावण्यात आले. घटनास्थळी एक ब्लेड सापडले आहे. ही घटना घडली त्यावेळी पीडितेचे आई-वडील आणि भाऊ शेतात काम करण्यासाठी गेलेले होते. तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत अज्ञाताने तिचा खून केला असे सांगितले जात आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी एक ब्लेड सापडले असून ते या धक्कादायक प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील नांदूसा येथे शिवाजी कांबळे यांचे कुटुंबिय राहते. आज सकाळीच शिवाजी कांबळे त्यांची पत्नी, एक मुलगी व एक मुलगा शेतात गेले होते. तर घरी प्रियंका शिवाजी कांबळे (१२) व तिचा लहान भाऊ होता. सकाळी सुमारे साडेदहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास तिचा भाऊ बाहेर गेला होता. त्यानंतर अज्ञात आरोपीने घरातील एका खोलीच्या बाहेर प्रियंकाचा गळा कापून खून केला. त्यानंतर घरातून पोबारा केला. त्यानंतर काही वेळातच प्रियंका हिची बहिण शेतातून घरी आल्यानंतर तिला प्रियंका ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. तिने तातडीने हा प्रकार तिच्या आई वडिलांना कळविला. त्यानंतर शिवाजी कांबळे व इतर गावकरी घरी आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मलपिल्लू, जमादार मगन पवार, पंजाब हराळ, भगवान मंडलीक, प्रविण राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावर एक ब्लेड आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता काही जणांचे जबाव घेण्यास सुरुवात केली आहे. तर या खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...