आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:नाकाबंदीदरम्यान दुचाकी थांबविल्यावरुन पोलिस कर्मचाऱ्यास जिवे मारण्याची धमकी

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत शहरात नाकाबंदीच्या वेळी दुचाकी थांबवून चौकशी का केली या कारणावरुन पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाविरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 3) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून वसमत शहरात रात्रीच्या वेळी नाकाबंदी सुरु आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी दुचाकी व चारचाकी वाहनांसोबतच पायी फिरणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. त्यासाठी पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान, वसमत शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुनील गोरलावाड हे रविवारी ता. २ रात्री वसमत येथील सिंचन वसाहतीच्या परिसरातील मार्गावर कर्तव्यावर होते. यावेळी एक विना क्रमांकाची दुचाकी आल्यामुळे त्यांनी दुचाकीस्वारास थांबवून त्याची चौकशी सुरु केली. मात्र माझी चौकशी का करतो असे म्हणत दुचाकीवरील तुकाराम काळे याने पोलिस कर्मचारी गोरलावाड यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी गोरलावाड यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात तुकाराम काळे याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक खार्डे, जमादार भगीरथ सवंडकर पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...