आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागाव पातळीवरील विकास कामे कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्चअखेरपर्यंत पूर्ण झाली पाहिजेत, कामे राखडल्यास संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा इशारा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात गाव पातळीवरील विकास कामे विविध कारणावरून रखडली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची मोठी अडचण होऊ लागली. सदरील विकास कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय बैठका घेतल्या जात आहेत.
हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या षटकोणी सभागृहात उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राठोड यांच्या उपस्थितीत तालुक्यातील ग्रामसेवक तसेच पाणीपुरवठा विभाग, लघु सिंचन विभाग, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे गट विकास अधिकारी मिलिंद पोहरे, सहाय्यक गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांची उपस्थिती होती.
यावेळी गाव निहाय कामांचा आढावा घेण्यात आला. तालुक्यामध्ये जनसुविधा योजना हमी योजना तसेच वित्त आयोगाची कामे मोठ्या प्रमाणावर रखडल्याचे आढळून आले. या सोबतच इतर विकास कामे देखील रखडल्याने डॉ. राठोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शासनाच्या विविध योजनांची कामे कुठल्याही परिस्थितीत मार्चअखेरपर्यंत पूर्ण झाली पाहिजेत त्यासाठी आतापासूनच नियोजन करा अशा सूचना डॉ. राठोड यांनी दिल्या. आगामी काळात हमी योजनेची कामे सुरू करण्याबाबत मजुरांकडून मागणी येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने हमी योजनेची कामे शेल्फवर ठेवावीत. मजुरांची मागणी आल्यानंतर तातडीने कामाला सुरुवात करावी. कामाची मागणी करूनही काम मिळाले नाही अशी तक्रार येता कामा नये अशी सक्त ताकीद यावेळी देण्यात आली. गाव पातळीवर कामांबाबत अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी तालुका स्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. काम न करता अडचणी सांगू नये अशा शब्दात डॉक्टर राठोड यांनी यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांना सुनावले.
सध्या कोळीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यानुसार मोठ्या शहरातून गावांमध्ये येणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात राहून त्यांच्या वेळोवेळी आरटीपीसीआर चाचण्या करून घ्याव्यात. गृह विलगीकरण तसेच संस्थात्मक विलगीकरण करण्याचे नियोजन करावे. प्रत्येक गावात शंभर टक्के लसीकरणासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, थोडेसे मायबापा साठी या उपक्रमांतर्गत गाव पातळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना हाती घ्याव्यात अशा सूचनाही डॉ. राठोड यांनी दिल्या. मार्चअखेरपर्यंत कामे पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.