आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli News | Marathi News | Bribe Of Rs 23,000 For Ordering Pay Hike For Adarsh Shikshak Puraskar; The Two From The Education Department Were Caught Red Handed

लाजखोरी:आदर्श शिक्षक पुरस्काराच्या वेतनवाढीचे आदेश काढण्यासाठी 23 हजाराची लाच; शिक्षण विभागाच्या दोघांना रंगेहाथ पकडले

हिंगोली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या वेतनवाढीचे आदेश काढण्यासाठी २३ हजाराची लाच घेणाऱ्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यकासह कार्यालयीन अधिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ता. १३ दुपारी रंगेहाथ पकडले. सचिन अडबलवार (वरिष्ठ सहाय्यक), संतोष मिसलवार (कार्यालयीन अधिक्षक) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हयात आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना जादा वेतनवाढ देण्याचे आदेश काढण्यासाठी तक्रारदार शिक्षकाने मागील काही दिवसांपासून शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरु केला होता. मात्र त्यांना शिक्षण विभागाकडून दाद दिली जात नव्हती. मात्र सन २०१९ पासून पाठपुरावा केल्यानंतर ता. ३ जानेवारी २०२२ रोजी जादा वेतनवाढ देण्याचे आदेश काढले. त्यासाठी संबंधितांनी लाचेची मागणी केली.

मात्र तक्रारदार शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानुसार आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक निलेश सुरडकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख युनुस उर्फ शेख शकील, जमादार विजय उपरे, तान्हाजी मुंडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, सुजित देशमुख, राजाराम फुफाटे, रुद्रा कबाडे यांच्या पथकाने जिल्हा परिषदेत सापळा रचला.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कॅन्टींन मध्ये अडबलवार यास २० हजाराची लाच घेतांना पकडले.त्यांनतर जिल्हा परिषद शिक्षण विभागात मिसलवार यास ३ हजाराची लाच घेतांना पकडले. लाचलुचपत विभागाने दोघांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणी शिक्षण विभागाचा एक अधिकारही पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे

बातम्या आणखी आहेत...