आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:किरीट सोमय्यांचा फोन आला अन् चंद्रकांत पाटलांनी केले स्मितहास्य; महाविकास आघाडीच्या कारभारावरावरही ओढले ताशेरे

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दादा, राज्य सरकारचे 1500 कोटी रुपयांचे कंत्राट रद्द झाले, तुमचे अभिनंदन असा भाजपा नेते किरीट सोमय्यांचा दुरध्वनी आला अन् भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्मितहास्य केले. मात्र हे नेमके कोणते कंत्राट होते हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. बुधवारी ता. 20 शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.

येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, मिलींद यंबल, सचिन जायभाये, संतोष टेकाळे, प्रशांत सोनी यांची उपस्थिती होती.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र सोडले. खोटे बोल पण रेटून बोल अशी महाविकास आघाडीची भुमीका असल्याचा आरोप त्यांनी केला. पेट्रोल डिझेल दरवाढीवर आंदोलन करणाऱ्यांनी पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यात का विरोध केला, असा सवाल त्यांनी केला. काही वेळापुर्वीच किरीट सोमय्या यांनी दुरध्वनी करून आपले अभिनंदन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शासनाचे 1500 कोटी रुपयांचे कंत्राट रद्द झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केल्याचे सांगितले मात्र नेमके कोणते कंत्राट होते हे त्यांनी सांगितले नाही.

मराठवाड्यात झालेल्या नुकसानीबाबत कशाचा कशाला पत्ता नाही राज्य सरकारची हिच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागेल. मात्र दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांच्या हाती काही ना काही रक्कम मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भाजपाच्या वतीने आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने कर्ज काढले त्याच धर्तीवर शेतकऱ्यांसाठीही राज्य सरकारने कर्ज काढले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. आमच्या सोबत आता आहेत त्याच पक्षांसोबत राहून आगामी निवडणुका लढवून आम्ही जिंकणार असल्याचा दावाही पाटील यांनी केला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये एकत्रीत निवडणुका लढविण्याचे साहस नसल्याचा आरोप त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...