आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:ऑक्सिजन प्रकल्पातील गॅस लिकेजच्या अफवेने बघ्यांची गर्दी, प्रेशर वॉल काढल्याचे कळाल्याने नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरालगत औंढा नागनाथ मोरगाव ऑक्सिजन प्लांटचे प्रेशर कमी करण्यासाठी वॉल काढण्यात आला. यावेळी ऑक्सिजन गळती होत असल्याच्या अफवेने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र प्रेशर वॉल काढल्याचे कळालं तर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

हिंगोली शहरालगत औंढा रोड भागात कोविड केअर सेंटरच्या परिसरात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या ठिकाणी 13 हजार लिटरची लिक्विड प्रकल्पाची क्षमता आहे. या ठिकाणी तयार होणारे ऑक्सिजन कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पुरविले जात होते.

मात्र मागील काही दिवसापासून या कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर होत नाही. सध्या याठिकाणी आठ हजार चारशे लिटर ऑक्सिजन आहे. मात्र या ठिकाणी ऑक्सिजन तयार होताना प्रकल्पातील साठवण टाकीमध्ये ऑक्सीजन गॅसचे प्रेशर वाढते. त्यामुळे प्रत्येक वेळी लक्ष ठेवून दहा बार पेक्षा अधिक प्रेशर झाल्यानंतर तातडीने प्रेशर कमी करावी लागते.

दरम्यान दुपारी तीन वाजता या प्रकल्पाच्या टाकीमध्ये दहा-बारा ऑक्सिजन चे प्रेशर तयार झाले होते त्यामुळे सायंकाळी ऑक्सिजन गॅस वॉल द्वारे सोडण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. रात्री साडेसात वाजता हे प्रेशर १० बार पेक्षा अधिक झाल्याने वॉल सोडण्यात आला.

त्यामुळे परिसरात ऑक्सीजन गॅस बाहेर पडू लागला. मात्र हि गॅस गळती होत असल्याची अफवा पसरली अन घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. अनेकांनी आरोग्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून या प्रकाराची माहिती दिली. मात्र त्याठिकाणी गॅस गळती नसून गॅसचे प्रेशर कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

गॅस प्रेशर रिलीज करणे रुटीन प्रक्रिया : डॉ. स्नेहल नगरे
ऑक्सिजन गॅस प्रकल्पातील प्रेशर वाढल्यानंतर गॅस प्रेशर रिलीज करणे रूटीन प्रक्रिया आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. सध्या प्रकल्पाच्या टाकीमध्ये दहा बार प्रेशर झाल्यामुळे हे प्रेशर कमी करून साडेपाच बार करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...