आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या प्रलंबित चलन वसूली मोहिमेत हिंगोली जिल्ह्यात साडेपाच हजार वाहनांकडून तब्बल २२.६९ लाख रुपयांचा दंड वसूल करत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.
राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलिसांनी केलेल्या अनपेड ( प्रलंबित ) केसेसचा निपटारा करण्याच्या सूचना राज्यातील पोलिस अधीक्षकांना दिल्या होत्या. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उपअधीक्षक ग्रामीण व्ही. टी.वाखारे यांच्या मार्गदर्शनात हिंगोली शहर वाहतूक शाखेने मोहिम हाती घेतली होती.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, जमादार किरण चव्हाण, शेषराव राठोड, रावसाहेब घुमणर चंद्रकांत मोटे, फुलाजी सावळे, वसंत चव्हाण, रवी गंगावणे, गजानन राठोड, सुभाष घुगे, शिवाजी पारस्कर, गजानन सांगळे, रमेश ठोके, बळी शिंदे, तानाजी खोकले अमित मोडक महिला कर्मचारी सुषमा भाटेगावकर, भारती दळवे, वाहन चालक घुगे, काशिदे, जैस्वाल यांनी मागील पाच दिवसात मोहिम राबवली. यामध्ये ५४७५ केसेसचा निपटारा करून २२. ६९ लाख रुपये प्रलंबित चलन वसुल केला आहे. विशेष म्हणजे भौगोलिक आकाराने आणि तुलनेने कमी वाहन संख्या असलेला हिंगोली जिल्ह्यातील वाहतुक शाखेची कामगिरी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे.
मोहिम सुरू राहणार : राकेश कलासागर, पोलिस अधिक्षक
सदर मोहिम सुरु राहणार असून नागरिकांनी त्यांचे वाहनावरील प्रलंबित चलन वाहतूक शाखेत अथवा महा ट्रॅफिक अॅपद्वारे भरून घ्यावे. तसेच वाहतुकीचे नियम पाळून नवीन चलन होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.