आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli News : Zilla Parishad Will Provide Market If Self help Groups Produce Quality Goods, Says Chief Executive Officer Sanjay Daine

हिंगोली:बचतगटांनी दर्जेदार वस्तू तयार केल्यास बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा परिषद करणार, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पतींना लसीकरणासाठी प्रवृत्त करा : संजय दैने, मुख्यकार्यकारी अधिकारी

हिंगोली जिल्हयातील महिला बचतगटांनी दर्जेदार वस्तू तयार कराव्यात त्यांना बाजारापेठ उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा परिषद करेल असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी सोमवारी ता. ११ बचगटांना कर्ज वाटप मेळाव्यात केले.

येथील केमीस्ट भवन येथे आयोजित मेळाव्यास मुख्यकार्यकारी अधिकारी दैने यांच्यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक निलेश कानवडे, तसेच बँक ऑफ इंडियाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १६० महिला बचतगटांना सुमारे बँक आॅफ इंडीयाच्या वतीने कर्ज वाटप करण्यात आले. तर चार दिवसांपुर्वीच १६० गटांना १ कोटी ७९ लाख रूपये कर्ज वाटप झाले आहे.

यावेळी बोलतांना दैने म्हणाले की, हिंगोली जिल्हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत छोटा जिल्हा असला तरी या ठिकाणी बचतगटांची मोठ्या संख्येने स्थापना झाली आहे. महिला देखील आता बचतगटाच्या माध्यमातून लहान, मोठे व्यवसाय सुरु करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत हि जिल्ह्यासाठी अभिनानाची बाब आहे. महिला बचत गटांनी त्यांना दिलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करून व्यवसाय सुरु करावेत. तसेच गटाच्या माध्यमातून नवनवीन वस्तू तयार कराव्यात. गटांनी दर्जेदार वस्तू तयार केल्यानंतर त्या वस्तूंना मोठ्या शहरात बाजारपेठ मिळवून देण्याचे काम जिल्हा परिषद करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. वेळ प्रसंगी गटांनी बाजारपेेठेत कुठल्या वस्तूंना अधिक माहिती आहे याचा अभ्यास करून त्यानुसार वस्तू तयार करण्याचे काम हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सुत्रसंचालन जे. व्ही. मोडके यांनी केले.

पतींना लसीकरणासाठी प्रवृत्त करा : संजय दैने, मुख्यकार्यकारी अधिकारी

सध्या कोविड लसीकरणाची मोहिम सुरु आहे. बचत गटाच्या महिलांनी त्यांच्या पतीला लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करावे. जो पर्यंत लसीकरण करून घेत नाही तोपर्यंत त्यांचे जेवणच बंद करा. कोविडसाठी लसीकरण आवश्यक आहे हे त्यांना पटवून द्यावे. सर्वांच्या प्रयत्नातून हिंगोली जिल्हा शंभर टक्के लसीकरण झालेला जिल्हा होऊ शकेल

बातम्या आणखी आहेत...