आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:डिग्रसमध्ये ओल्या बाळंतीणीचे नऊ तास पाण्याविना हाल, कोरोनाच्या भीतीने माणुसकीचाही पडतोय विसर

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरात पाणी नसल्याने स्वयंपाक कसा करावा असा प्रश्‍न कुटुंबासमोर निर्माण झाला होता

कळमनुरी तालुक्यातील डिग्रस येथे माहेरी आलेल्या ओल्या बाळांतीनीचे नऊ तास पाण्यावाचून हाल झाले. काही गावकरी पाणी भरु देत नसल्याने माहेरी येऊन आराम करण्यापेक्षा नवीनच संकट त्यांच्या समोर उभे राहिले होते. कोरोनाच्या भीतीने माणुसकीचाही विसर पडत असल्याचे चित्र शुक्रवारी (15 एप्रिल) पहावयास मिळाले. मात्र दहा तासानंतर केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांच्या पुढाकारातून सूर्यवंशी कुटुंबाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला.

कळमनुरी तालु्क्यातील डिग्रस येथील अंतोष बालाजी सुर्यवंशी यांची दुर्गा वाकळे व भाऊजी मुळशी (पुणे) येथे कामाला आहेत. दुर्गा वाकळे यांच्या बाळंतपणात त्यांची देखभाल करण्यासाठी सुर्यवंशी यांची आई उज्वला सुर्यवंशी ह्या मुळशी येथे गेल्या होत्या. एक महिन्यापुर्वी दुर्गा वाकळे यांची प्रसुतीही झाली. मात्र पती कामाला जात असल्याने कोरोनाच्या भीतीने दुर्गा वाकळे व त्यांची आई उज्वलाबाई ह्या गुरुवारी (14 एप्रिल) पहाटे तीन वाजता गावी आल्या. मात्र गावात आल्यानंतर काही जणांनी त्यांना होमक्वारंटाईन होण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचे भाऊ बालाजी सुर्यवंशी हे त्यांना घरी घेऊन गेले. मात्र काही गावकऱ्यांनी त्यांना पाणी भरण्यास मज्जाव केल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. गुरुवारी पहाटेच आल्याबरोबर भरून घेतलेले पाणी गुरुवारी रात्रीच संपले. आज सकाळपासून त्यांना पाणीच मिळाले नाही. त्यामुळे मागील नऊ ते दहा तासांपासून ओल्या बाळांतीनीचे पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. त्यानंतर तलाठी देविदास गायकवाड यांनी गावात भेट दिली. ग्रामपंचायत सेवकास सांगितल्यानंतर त्यांना दोन हंडे पाणी मिळाल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. मात्र दुपारपर्यंत हातपंपावरून पाणी भरु देण्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाणी नसल्याने बेहाल : संतोष सुर्यवंशी

मागील दहा तासांपासून पाणी नसल्याने स्वयंपाक कसा करावा असा प्रश्‍न निर्माण झाला होता. आम्हाला होम क्वारंटाईन केल्याने घराबाहेरही पडता येत नाही. घरी आई, वडिल, बहिण व लहान मुले आहेत. त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्याइतकेही पाणी नाही, असे संतोष सुर्यवंशी यांनी सांगितले.

दहा तासानंतर मिळाले पाणी

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तलाठी देविदास गायकवाड ग्रामसेवक केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांनी गावात भेट देत गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर एका हातपंपावरून सूर्यवंशी कुटुंबांना पाणी भरून देण्यात आले. त्यामुळे दहा तासानंतर पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

बातम्या आणखी आहेत...