आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:हिंगोली पोलिस दलातील जमादाराचे म्युकोरमायकोसीसने निधन, कोरोनावर केली होती मात, औरंगाबाद येथे सुरु होते उपचार

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यातील जमादार विनायक बोधेमवाड (४९) यांचा कोविडवर मात केल्यानंतर म्युकोर मायकोसीस आजाराने सोमवारी ता. २४ पहाटे औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले जमादार बोधेमवाड हे ता. २६ एप्रील रोजी कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. मात्र ता. ७ मे रोजी त्यांना म्युकोर मायकोसीसचा संसर्ग झाला. त्यांच्या नाकाला संसर्ग झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते तर त्यांच्या नाकावर शस्त्रक्रिया देखील झाली होती. मात्र उपचार सुरु असतांनाच आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मयत जमादार बोधेमवाड हे मुळचे नांदेड जिल्हयातील दाताडा (ता.कंधार) येथील रहिवासी आहेत. ता. ३० मार्च १९९३ रोजी ते परभणी जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते. त्यांनतर हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर ते हिंगोली जिल्हा पोलिस दलात दाखल झाले. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कुरुंदा, हट्टा,हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात त्यांनी काम पाहिले. गुंतागुंतीचे तपास उघडकीस आणण्यास त्यांचा हातखंडा होता. शिस्तप्रिय जमादार म्हणून त्यांची पोलिस दलात ओळख होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...