आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगाेली:हिंगोलीत साठा संपला; लसीकरण मोहिमेस ब्रेक, नागरिकांना लस न घेताच परतावे लागले

हिंगाेली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात अाॅक्सिजनचा जाणवतोय तुटवडा

हिंगोली जिल्ह्यात लसीचा तुटवडा कायम अाहे. वारंवार लस संपत असल्याने या मोहिमेलाच घरघर लागली आहे. लसीअभावी पुन्हा दोन दिवस मोहीम थांबवावी लागली. शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील गावकऱ्यांना लसीकरण केंद्रावरून लस न घेताच घरी परतावे लागले.

हिंगोली जिल्ह्यात ३२ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. यात तीन खासगी रुग्णालयाचाही समावेश आहे. शासकीय लसीकरण केंद्रावर दिवसभरात लसीकरण केले जात असले तरी लस वाया जाऊ नये म्हणून खासगी लसीकरण केंद्रावर मात्र नोंदणी केल्यानंतर दहा व्यक्तींची नोंदणी झाल्यानंतर लसीकरण केले जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ५२,१२० नागरिकांना काेव्हॅक्सिन व काेविशील्ड लसीचे डाेस देण्यात अाले. मात्र आता कोविशील्ड लसीचा पुरवठाच नसल्याने या लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. आता कोव्हॅक्सिन ही लसदेखील संपल्यामुळे लसीकरण मोहीम थांबवावी लागली आहे. जिल्ह्यात १७ व १८ एप्रिल रोजी लस संपल्यामुळे लसीकरण थांबवावे लागले. त्यानंतर २० रोजी तीन हजार लस उपलब्ध झाल्याने लसीकरण सुरू झाले. मात्र २२ एप्रिलपासून पुन्हा एकदा लस संपल्याने लसीकरण बंद करण्यात आले. आता सोमवारी २६ रोजी लस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात अाॅक्सिजनचा जाणवतोय तुटवडा
जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेड उपलब्ध होत नाहीत. याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनदेखील बोटावर मोजण्याएवढेच मिळू लागले आहेत, तर आॅक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यानंतर आता लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांची मात्र चांगलीच अडचण होत आहे.

बातम्या आणखी आहेत...