आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वस्त धान्य दुकानदाराकडून ३० हजाराची लाच घेणाऱ्या हिंगोलीच्या जिल्हा पुरवठा विभागातील महसुल सहाय्यक व सेविकेस तडकाफडकी निलंबीत करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी ता. ८ काढले आहेत.
वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा निलंबीत झालेला परवाना पुन्हा देण्यासाठी तसेच परवाना नुतनीकरणासाठी जिल्हा पुरवठा विभागातील महसुल सहाय्यक शंभुनाथ दुभळकर याने सेविका जमुनाबाई इसाये यांच्या मार्फत तीस हजार रुपयांची लाच घेतली होती. लाचलुचपतचे उपाधिक्षक निलेश सुरडकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महमद युनूस, जमादार विजय उपरे, तान्हाजी मुंडे, विजय शुक्ला, ज्ञानेश्वर पंचलिंगे, अवि किर्तनकार, हिंमतराव सरनाईक, राजाराम फुफाटे, योगिता अवचार पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दोघांवर शनिवारी ता. ४ गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, या घटनेचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक निलेश सुरडकर यांनी सोमवारी ता. ६ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्यावरून महसुल सहाय्यक दुभळकर, सेविका इयाये यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी काढले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.