आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli :Transfers Begin With Police Officer's Birthday Celebrations, New Initiatives By Superintendent Of Police Rakesh Kalasagar

हिंगोली:पोलिस कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करून बदल्यांना सुरुवात, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या पुढाकारातून नवीन उपक्रम

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हा पोलिस दलात बदलीच्या समुपदेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करून बदली प्रक्रियेला सुरवात करण्यात आली. शुक्रवारी ता. ३० सकाळी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या पुढाकारातून या उपक्रमामुळे उपस्थित अधिकारी अन कर्मचारीही भारावून गेले होते.

हिंगोली जिल्हा पोलिस दलात मागील काही दिवसांपासून प्रशासकिय बदल्यांच्या हालचाली सुरु होत्या. त्यासाठी बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज व पोलिस ठाण्याचा विकल्प देण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे १२६ कर्मचाऱ्यांनी अर्ज दिले होते. यामध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, जमादार, पोलिस नायक यांच्या बदल्यांचा समावेश होता.

दरम्यान, आज सकाळी बदलीपात्र कर्मचाऱ्यांना समुपदेशनासाठी बोलाविण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी १० वाजल्यापासूनच कर्मचारी पोलिस अधिक्षक कार्यालयात हजर झाले. यावेळी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांची उपस्थिती होती.

दरम्यान, यावेळी पोलिस कर्मचारी पंडीत तारे यांचा वाढदिवस असल्याचे कळताच पोलिस अधिक्षक कलासागर यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी केक कापून त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी समुपदेशनासाठी आलेले सर्वच पोलिस कर्मचारी हजर होते. पोलिस कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करून त्यानंतरच बदली प्रक्रियेला सुरवात करण्यात आली. पोलिस अधिक्षक कलासागर यांच्या या उपक्रमाने उपस्थित अधिकारी अन कर्मचारीही भारावून गेले होते.

त्यानंतर बदलीसाठी अालेल्या कर्मचाऱ्यांच्या समुपदेशन पध्दतीने बदल्या करून त्यांना हवी ते पोलिस ठाणे देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसू लागले होते.

बातम्या आणखी आहेत...