आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:हिंगोली वाहतूक शाखेच्या सरप्राईज मोहिमेमध्ये 60 दुचाकी वाहने जप्त, 100 वाहनांवर कारवाई तर 80 हजारांचा दंड वसूल

हिंगोली - मंगेश शेवाळकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील चौकात शहर पोलिस ठाणे व वाहतूक शाखेच्या सरप्राईज मोहिमेमध्ये शुक्रवारी सायंकाळी अवघ्या एका तासात ६० वाहने जप्त करण्यात आली असून शंभर वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ८० हजारांचा दंड वसूल झाला आहे.

हिंगोली शहरात सण उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिस ठाणे वाहतूक शाखा यांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी बिरसा मुंडा चौकात सरप्राईज वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंडित कच्छवे, वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रकांत कदम पाटील, उपनिरीक्षक वाघमारे, राखुंडे, जमादार फुलाजी सावळे तानाजी खोकले किरण चव्हाण गजानन सांगळे, गजानन राठोड यांच्या पथकाने सायंकाळी मोहीम हाती घेतली.

या मोहिमेमध्ये ६५ दुचाकी वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले. या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच ६० वाहनांवर नंबर नसल्यामुळे ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय १०० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून अवघ्या दोन तासात तब्बल ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हिंगोली शहरात पोलीस विभागाच्या या मोहिमेमुळे विना नोंदणी तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वाहन चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बातम्या आणखी आहेत...