आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीने शेतकरी संकटात!:साहेब, सरकारकडून आमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाही, आता तुमच्याकडूनच अपेक्षा; संतप्त शेतकऱ्यांचा मविघा सरकार विरोधात नाराजीचा सूर

हिंगोली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहेब, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, मात्र सरकारकडून आमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत, आता तुमच्या कडूनच अपेक्षा असल्याचे सांगत हिंगोली तालुक्यातील आडगाव व कन्हेरगाव नाका येथील शेतकऱ्यांनी शनिवारी महाविकास आघाडी सरकार विरोधात नाराजीचा सूर काढला.

हिंगोली जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर आज हिंगोली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सुरुवातीला कनेरगावनाका त्यानंतर आडगाव येथे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. एकीकडे नुकसान झाले असून शेतकऱ्यांकवर मोठे संकट आहे. दुसरीकडे शासनाकडून ऑनलाईन माहिती भरा, विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार करा असे सांगत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नाहीत त्यांनी काय करायचे. शासनाने व विमा कंपनीने विम्याचे नियमच कठीण केले त्यामुळे या सरकार कडून आमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. आता तुमच्यावरच आमच्या अपेक्षा आहे. जास्तीत जास्त मदत करण्यासाठी शासनाला प्रवृत्त करा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडून विमा मिळवून देण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

'विमाकंपन्या केवळ कागदीघोडे नाचवितात'

यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाब विचारला. शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. त्यांचे नुकसान झाल्यानंतर त्यांना विमा मिळालाच पाहिजे. विमा कंपन्या केवळ कागदीघोडे नाचविते आहेत. शेतकऱ्यांनी विमा भरल्यानंतर त्यांना विमा मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना विमा नाकारणाऱ्या विमा कंपन्यावर कारवाई का करीत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...