आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बाहेर राज्यातून आलेल्या दोघांना बुधवारी पहाटेच्या सुमारास घरी न जाऊ देता थेट आरोग्य विभागाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहेत. त्यांचे स्वॅब नमुने निगेटीव्ह आले तरी त्यांना चौदा दिवस या ठिकाणी थांबावे लागणार आहे.
हिंगोली जिल्हा ऑरेंज झोन मधून ग्रिन झोनमध्ये यावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यातील एकमेव रुग्णाचे चौदा दिवसानंतरचे दोन स्वॅब नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.किशोर श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. नारायण भालेराव यांच्या पथकाने त्याच्यावर उपचार केले आहेत. त्यामुळे त्याची प्रकृती ठणठणीत आहे.
दरम्यान, आता यापुढे खबरदारीचा उपाय म्हणून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना थेट आरोग्य विभागाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. या शिवाय पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांनी चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहनांची कसून तपासणीच्या सुचना दिल्या. तर ग्रामीण भागातून आरोग्य सेवा सुरळीत रहावे तसेच गावे निर्जंतुकीकरम करण्याच्या सुचना मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिल्या आहे. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आहे.
दरम्यान, बुधवारी ता. १५ पहाटे दोन वेगवेगळ्या घटनेत दोघे जण हिंगोली जिल्हयात प्रवेश करत होते. त्यापैकी एक जण अहमदाबाद येथून तर एक जण हैदराबाद येथून आला आहे. त्या दोघांनाही आरोग्य विभागाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. त्यांचे स्वॅबनमुने निगेटीव्ह आले तरी त्यांना चौदा दिवस क्वारंटाईन सेंटरमधे ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई येथून आलेली महिला निगेटीव्ह
मुंबई येथील नागपाडा भागातून आलेली महिला शासकिय रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरत आहे. त्यांचे स्वॅब नमुने निगेटव्ह आले असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना चौदा दिवस या वॉर्डमधेच ठेवले जाणार आहे.
जिल्ह्यातील नागरीकांच्या आरोग्यासाठी हाच उपाय : रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी
हिंगोली जिल्हा ऑरेंज झोन मधून ग्रीन झोन मध्ये आणण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी जिल्हयात प्रवेश करणाऱ्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांनीही आता चौदा दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये थांबण्याची तयारी ठेऊनच जिल्ह्यात प्रवेश करावा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.