आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हिंगोलीची मॅरेथॉन स्पर्धा नागपूरच्या साहील लहाने याने गाजवली, स्वच्छ सर्वेक्षण अभियनांतर्गत झाली स्पर्धा

हिंगोली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शनिवारी ता. २ आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत १७ वर्षा खालील मुलांच्या गटात नागपूरच्या साहील लहाने तर मुलींच्या गटात जिंतूरच्या सायली शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावरून या स्पर्धेला सुरवात झाली. स्पर्धेचे उदघाटन आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, अभियंता रत्नाकर अडशिरे, बाळू बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत ४० वर्षावरील गटातत प्रथम गगन भट, द्वितीय संतोष मस्के, तृतीय धिरज जयस्वाल, चौथा सुधीर देशमुख (सर्व रा. हिंगोली) यांनी यश मिळविले. १७ वर्षा वरील पुरुषांच्या गटात प्रथम छगन बोंबले (खांबळा), द्वितीय शुभम शिंदे (सावा), तृतीय ऋषीकेश मोरे (इंचा). मुलींच्या गटात प्रथम अश्विनी जाधव, निकीता म्हात्रे (दोघी परभणी), गायत्री गायकवाड (वैजापूर, औरंगाबाद).

१७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम साहील लहाने (नागपुर), द्वितीय ओम कव्हेरकर (हिंगोली), तृतीय ओम पोले (औंढा). मुलींच्या गटात सायली शिंदे (जिंतूर), शितल जाधव (आैरंगाबाद), तृतीय माधवी पानचावके (उदगिर) यांनी यश मिळविले आहे. या स्पर्धकांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. परिक्षक म्हणून रमेश गंगावणे, आर. एम. व्यवहारे, नितीन मोरे, अनिल लोळेवार यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

मुख्याधिकाऱ्यांनी सादर केले देशभक्तीपर गित
यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गिताने उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या गितांना उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला.

बातम्या आणखी आहेत...