आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लहान मुलांना संसर्ग झाल्यास घरच्या मदतनिसाला परवानगी

अतुल पेठकर | नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिसऱ्या लाटेसाठी कोरोना कृती दलाची रूपरेषा तयार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले सर्वाधिक प्रभावित हाेतील, असा अंदाज असल्याने लहान मुलांवरील कोराेना उपचाराचा कृती आराखडा ठरवण्यासाठी स्थापन केलेल्या कृती दलाने आराखडा तयार केला आहे, अशी माहिती कृती दलाचे प्रमुख डाॅ. सुहास प्रभू यांनी “दिव्य मराठी’ला दिली. हा आराखडा आरोग्य खात्याला सादर केला आहे. शाळांमधून विद्यार्थ्यांना माहिती दिली जावी, अशी सूचनाही केली आहे.

दहा लाख लोकसंख्येमागे १५० ते २५० खाटा असणे आवश्यक राहील. मुंबईतील बीकेसीप्रमाणे एक विशाल कोरोना उपचार केंद्र स्थापन करावे लागेल. लेआऊट आणि उपकरणे ही प्रौढांसाठी डिझाइन केलेल्या वर्तमान केंद्रांसारखी असू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये कुटुंबातील एखादा सदस्य उपस्थित राहू शकेल. २५ खाटांच्या बालकांच्या कोरोना वाॅर्डात तीन बालराेगतज्ज्ञांची १२ तास ड्यूटी आवश्यक राहील, असे कृती आराखड्यात नमूद केले आहे.

औषधोपचाराचा प्रोटाेकाॅल तयार : मोठे आणि लहान मुलांवरील औषधोपचारात निश्चितच फरक राहील. मोठ्यांना दिली जाणारी अनेक औषधे व इंजेक्शन लहानांना दिली जात नाहीत, तर लहानांसाठी काही औषधे वेगळी आहेत. मुलांच्या आैषधाेपचारांचा संपूर्ण प्रोटोकाॅल तयार केला असून मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे, असे डाॅ. प्रभू यांनी सांगितले. कोरोनाबाधित मातांमध्ये जन्मलेल्या नवजात मुलांचा उपचार करताना बाळंतपण झाले त्याच दवाखान्यात उपचार होणे उत्तम राहील. याशिवाय प्रसूतीसाठी येणाऱ्या सर्व मातांची आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजन टेस्ट करावी. यात टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास बाळ आणि बाळंतिणीवर अचूक उपचार होतील अशा रुग्णालयात उपचार केले जावेत, असे आराखड्यात नमूद केले आहे.

मुलांमध्ये कोरोनाचे २ प्रकार
राज्यात आजपर्यंत निष्पन्न झालेल्या ४.७७ दशलक्ष कोरोना रुग्णांपैकी ४ ते ६% प्रकरणे ० ते २० वर्षे वयाेगटातील आहेत. लहान मुलांच्या बाबतीत एकूण प्रकरणांपैकी १०% लहान मुले काेरोनाबाधित होतील, असा प्राथमिक अंदाज आहे. मुलांमध्ये कोराेना आजाराचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे तीव्र आजार. यात न्यूमोनिया इत्यादीमुळे गुंतागुंत होऊ शकते आणि दुसरा म्हणजे पिम्स-टीएस (ज्याला एमआयएस-सीदेखील म्हणतात) कृती दलातील बालरोगतज्ज्ञांच्या मतानुसार येत्या जुलैमध्ये लहान मुलांना कोरोना बाधा होण्याच्या प्रकरणांत वाढ हाेईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...