आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Home Minister Anil Deshmukh Announces Cancellation Of Police Recruitment GR; Consolation To The Students Of The Maratha Community

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठी बातमी:पोलिस भरतीचा जीआर रद्द, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा; मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुधारित शासन निर्णय लवकरच जाहीर होणार

राज्यातील पोलिस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पोलिस भरती प्रक्रियेसंदर्भात 4 जानेवारीला गृहविभागाने काढलेला जीआर अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलिस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. आता तो जीआर रद्द करण्यात आल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत अनिल देशमुख म्हणाले की, पोलिस शिपाई भरती 2019 करीता ज्या एसईबीसी उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण ?

एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीबाबत गृहविभागाने 4 जानेवारी रोजी जीआर काढला होता. एसईबीसीचे आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेतला होता. यात 'एसईबीसी'तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरवताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार असे सांगितले होते. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असे या निर्णयात म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...