आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Home Minister , Parambir Singh Cae Updates; 'Anil Deshmukh Should Resign On Moral Grounds;' Demand Of Leader Of Opposition Devendra Fadnavis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी:'नैतिकतेच्या आधारावर अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा;' विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'चौकशीत निर्दोष आढळल्यावर परत मंत्रीमंडळात घ्यावे'

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांची सीबीआयद्वारे चौकशी करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. कोर्टाने सीबीआयला 15 दिवसांत प्राथमिक चौकशीचा तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या निकालानंतर आता भाजपने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी तो तात्काळ स्विकारावा.'

न्यायालयाच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळे ते म्हणाले की, 'उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. महाराष्ट्रातील हप्ते वसुलीचे काम सरकारच्या आणि सरकारमधील मंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरू होते. आज या संदर्भात कडक पाऊलं उच्च न्यायाललायने उचलले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर गृहमंत्र्यांची चौकशी सीबीआयने करू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. पण, आता या प्रकरणाची चौकशी सीबीआयद्वारे होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चौकशी होईपर्यंत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जर ते या चौकशीत निर्दोष सापडले, तर त्यांना परत मंत्रिमंडळात घेण्यात यावे,' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणाऱ्या या घटनेचे सत्य बाहेर येईलच. सीबीआय चौकशीत कशाप्रकारे हप्ताखोरी चालली होती ते देखील बाहेर येईल.रश्मी शुक्लांचे आवाहन, परमबीर सिंह यांचे पत्र याकशा चुकीच्या आहेत, हे भासवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला माननीय उच्च न्यायालयाने जोरदार उत्तर दिले आहे. गृहमंत्री राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर, एखाद्या मंत्र्यावर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी सांगितल्यानंतर, त्यातही गृहमंत्र्याविरोधात अशी चौकशी सांगितल्यानंतर त्यांनी त्या पदावर राहणे अयोग्य आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केवळ राजकीय मागणी राहिली नसून आता उच्च न्यायालयाने देखील चौकशीचे आदेश दिल्याने गृहमंत्र्यांचा राजीनामा उचित राहील असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...