आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Home Rent Should Be Postponed For Three Months; Tenants Should Not Be Evicted For Non rent Of House Additional Chief Secretary Housing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सूचना:घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी, घर भाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये, गृहनिर्माण विभागाच्या घरमालकांना सूचना

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारवर परिणाम, अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन झाले बंद

देशात कोवीड 19 या साथीच्या रोगाच्या पार्श्वभुमीवर 3 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन जारी राहणार आहे. या परिस्थितीत सर्व व्यापार,व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने रोजगारावर परिणाम झाला आहे. राज्यात भाड्याच्या घरात राहणा-या लोकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी अशा सुचना गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी सर्व घरमालकांना दिल्या आहेत.

लॉकडाऊन परिस्थितीमुळे सर्व बाजारपेठा, व्यवसायिक संस्था, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारवरही परिणाम झालेला असून, अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. यामुळे अनेकांना अत्यंत कठीण अशा आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात भाड्याच्या घरात राहणा-यांना नियमित भाडे भरणे शक्य होत नसून, भाडे थकत असल्याची वस्तुस्थिती आहे.

या परिस्थितीत घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे रकमांची अदायगी न झाल्याने किंवा भाडे थकल्याने कोणत्याही भाडेकरूंना भाड्याच्या घरांमधून निष्कासित करण्यात येऊ नये, अशा सुचना सर्व संबंधित घरमालकांना अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...