आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भिगवणजवळील अपघातात पती-पत्नी आणि मुलगा ठार, लातूरच्या कुटुंबीयांवर काळाचा घाला

लातूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-पुणे या महामार्गावर भिगवणजवळ ट्रॅक्टर व कारच्या अपघातात एकाच कुटुंबातील आई-वडिलांसह मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. यात अरुण माने (४६), पत्नी गीता माने (४०), मुलगा मुकुंदराज माने (१२) यांचा मृत्यू झाला, तर साक्षी माने आणि कारचालक महादेव नेटके गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, लातूरचे टायर्सचे व्यापारी अरुण माने कुटुंबीय स्वतःची कार घेऊन (एमएच २४ एजे २००४) पुण्याकडे जात होते. रविवारी रात्री १० वाजता अचानक ट्रॅक्टर समोर आल्याने कारचा अपघात झाला. यात माने कुटुंबातील पत्नी व मुलगा हे दोघेजण जागीच ठार झाले, तर अरुण माने यांचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. गाडीचा चालक गंभीर जखमी आहे. तसेच अपघातात बचावलेल्या मुलीलाही दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. मृत अरुण माने यांचे टायर्सचे शोरूम आहे. त्यांचे लातूरच्या शिवाजी चौकात दुकान व कार्यालय आहे. तसेच निलंगा शहरात बिदर रोडवर त्यांचे माने टायर नावाने मोठे शोरूम आहे. या अपघाताबाबत इंदापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. लातूर येथील खाडगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर सोमवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.