आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:एकाच दोराने अन एकाच झाडाला गळफास घेऊन पती-पत्नीचा आत्महत्या, तीन वर्षापुर्वीच झाला होता विवाह

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक शिवारात एकाच झाडाला अन एकाच दोराने पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता. ३ सकाळी आठ वाजता उघडकीस आली आहे. रामदास बाळू इंगळे (२४) व शितल रामदास इंगळे (२२) असे त्यांची नावे असल्याचे त्यांचे नावेताईव व पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे तीन वर्षापुर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील मुळचे रहिवासी असलेले रामदास इंगळे यांनी काही वर्षापुर्वी दाताडा बुद्रुक शिवारात शेत घेतले होेते. त्यामुळे ते आखाड्यावरच राहात होते. तीन वर्षापुर्वीच रामदास यांचा विवाह विदर्भातील मडी या गावातील शितल यांच्या सोबत झाला होता. तर सहा महिन्यापुर्वीच रामदास यांचे वडिल बाळू इंगळे यांचे निधन झाले होते.

दरम्यान, तीन महिन्यापुर्वी शितल इंगळे ह्या माहेरी मडी यागावी गेल्या होत्या. त्यामुळे शेतातील आखाड्यावर रामदास इंगळे व त्यांची आई सरस्वतीबाई इंगळे हे दोघेच राहात होते. दोन दिवसापुर्वी रामदास देखील मडी येथे गेले होते. त्यानंतर ते आखाड्यावर आलेच नाही.

त्यानंतर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास काही शेतकरी दाताडा बुद्रुक शिवारातून जात असतांना एका झाडाला दोन मृतदेह लटकल्याचे दिसून आले. त्यांनी हा प्रकार गावात कळविल्यानंतर गावकरी घटनास्थळी आले. तसेच सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर वाघजाळी येथील काही गावकऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदर मृतदेह रामदास इंगळे व त्यांची पत्नी शितल इंगळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...