आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंध:साताऱ्यात प्रेमामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीकडून खून; मृतदेह पुरल्याचे उघडकीस

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केल्याचा प्रकार वहागाव येथे उघडकीस आला. शेतात जेसीबीने पंधरा फूट खोल खड्डा काढून पतीचा मृतदेह पुरल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी खड्डा खोदून मृतदेह तहसीलदार विजय पवार यांच्या उपस्थितीत बाहेर काढला. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. बरकत खुदबुद्दीन पटेल (३२, रा. वहागाव) असे खून झालेल्याचे नाव आहे.

वहागाव येथील बरकत पटेल बेपत्ता असल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी तळबीड पोलिसांत दाखल झाली होती. आपल्या पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती बरकत याला मिळाली होती. त्यामुळे त्याने पत्नीसोबत वाद घातला. यामुळे पत्नीने प्रियकरासोबत संगनमत करून पतीचा खून केला.

बातम्या आणखी आहेत...