आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिवाळी अधिवेशन:'तुमचे आव्हान मी स्वीकारतो, मला पाडूनच दाखवा'; अजित पवारांचे सुधीर मुनगंटीवारांना थेट चॅलेंज

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'माझ्या भाषणात जो अडथळा आणतो, तो पुन्हा जिंकू शकत नाही'

आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी सरकार आणि भाजपात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. सभागृहातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. यावेळी 'तुमचे आव्हान मी स्वीकारतो, मला पाडूनच दाखवा, असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना दिले.

आज राज्य सरकारने सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या. यावर बोलण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार उभे राहिले होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, भाषण वाढत असल्यामुळे मुनगंटीवार यांना मुद्यावर बोलण्याचे सांगितले असता, 'माझ्या भाषणात कुणी अडथळा आणत असेल किंवा अडकाठी आणत असेल तो पुन्हा निवडून येत नाही', असे विधान मुनगंटीवारांनी केले. यानंतर समोरच बसलेले अजित पवार म्हणाले की, 'तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, मला पाडूनच दाखवा,' असा खुमासदार टोला लगावला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser