आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

खडसेंचा गौप्यस्फोट:'मी स्वत:हून राजीनामा दिला नाही, वरिष्ठांचे नाव सांगून माझ्याकडून राजीनामा घेण्यात आला'- एकनाथ खडसे

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री आणि भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी नुकतंच त्यांच्या चरित्रावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव घेऊन आरोप केले होते. त्यानंतर आता खडसेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'माझ्यावर आरोप झाल्यानंर भाजपचे वरिष्ठ नेते माज्याकडे आले आणि त्यांनी राजीनामा मागितला, मी स्वत:हून राजीनामा दिला नाही', असे खडसे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, 'पक्षातील जेष्ठ नेत्यांचे नाव सांगितल्यामुळे मी कोऱ्या कागजावर सही केली होती. मी स्वतःहून माझ्या मर्जीने राजीनामा दिला नाही, पण पक्षाने मला तसं सांगायला भाग पाडले. माझ्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात एकाही विरोधकाने माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. आमच्या काळात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. अगदी देवेंद्र फडणवीसांवर आरोप झाले. त्यांच्या पत्नी अॅक्सिस बँकेत काम करतात आणि गृहविभागाची सगळी खाती तिकडे वळती करुन पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप लावण्यात आला. त्यांना किंवा इतर नेत्यांना राजीनामा द्यायला सांगितला नाही. परंतू, माझ्यावर आरोप झाले आणि दुसऱ्याच दिवशी मला राजीनामा द्यायला लावला', ही खंत खडसेंनी बोलून दाखवली.