आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • 'i Have Been Working With Bharatiya Janata Party For 40 Years, But ...'; Eknath Khadse Emotional During The Announcement To Leave The Party

खडसे भावुक:'40 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे काम पाहत आलो, पण...'; पक्ष सोडण्याच्या घोषणेदरम्यान एकनाथ खडसे भावुक

मुक्ताईनगर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या अगदी सुरुवातीपासून पक्षात असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर आज भाजपातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. पक्षातून बाहेर पडत असल्याची घोषणा करताना एकनाथ खडसे यांचा गळा भरून आला होता. यावेळी खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्षा सोडत असल्याचा आरोप केला.

मुक्ताईनगरमध्ये बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, 'माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला, त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, पोलिस याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते', असा आरोप खडसे यांनी केला.

खडसे पुढे म्हणाले की, 'मी 40 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे काम पाहत आलो. जेव्हा भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम केले. आतापर्यंत पक्षात काम करत असताना मला अनेक पदे मिळाली हे मी नाकारत नाही. मी कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही. पण, मी जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा दावा केला, त्यानंतर माझ्यावर अनेक आरोप झाले. अनेक वेळा चौकश्या झाल्या. इतक्या दिवसांपासून खूप अत्याचार सहन केले. माझ्या चौकशीची मागणी कुणीही केली नाही. विधिमंडळातील रेकॉर्ड काढावे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कोणताही पक्षा असेल त्यांनी राजीनामा आणि चौकशीची मागणी केली नव्हती. पण भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी केली आणि राजीनामा घेतला,' असेही खडसे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...