आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव:देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मला त्रास झाला; चरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षाकडून तिकीट मिळाले नाही, त्यामुळे अनेकदा एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. यातच परत एकदा खडसे यांनी जाहीरपणे नाराजीय व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्रास झाल्याची भावना व्यक्त केली. लेखक सुनिल नेवे यांनी लिहिलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू’ या एकनाथ खडसे यांच्या चरित्राचे प्रकाशन मुक्ताईनगरमध्ये झाले. यावेळी बोलताना, 'माझ्याविरुद्ध देवेंद्र फडणीस यांनी षडयंत्र रचले, मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो.' असा गंभीर आरोप खडसे यांनी केला.

मुक्ताईनगरातील खडसे यांच्या फार्म हाऊसवर मान्यवरांच्या उपस्थितीत ‘जनसेवेचा मानबिंदू’ या एकनाथ खडसे यांच्या चरित्राचे ऑनलाइन प्रकाशन झाले. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, 'मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यांना मुख्यमंत्री मिळाले, पण खांदेशला कधीच संधी मिळाली नाही. आमचा मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) ड्राय क्लीनर, कोणावरही आरोप झाले की लगेच क्लीन चिट दिली. पण, मला निर्दोष असताना क्लीन चिट नाही,' अशी खंत खडसेंनी व्यक्त केली.

खडसे पुढे म्हणाले की, 'लोक म्हणतात नाथाभाऊचे पक्षात काही अडकले असेल, म्हणून अन्याय होऊनही ते पक्ष सोडत नाहीत. परंतू, असे काही नाही. मी कधीच पक्षाविरोधात बोललो नाही. माझा जीव पक्षात अडकला आहे, म्हणूनच सगळ सहन करतोय. मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो. चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करण्याची धमक ज्याच्यामध्ये असते त्यांच्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करायची धमक ठेवतात. ती धमक माझ्यात आहे,' असेही खडसे यावेळी म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser