आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • I Will Write A Letter To Rashmi Thackeray About Writing In Dirty Language About Me In 'Saamana' Chandrakant Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सामना'तून टीका:'सामना'त माझ्याविषयी गलिच्छ भाषेत लिखाण, याबाबत रश्मी ठाकरे यांना पत्र लिहणार - चंद्रकांत पाटील

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर भाजप सामनातून नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर, शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. दरम्यान, 'सामनामध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली. त्याबाबत लिहिताना सामनाच्या अग्रलेखात माझ्याविषयी वापरलेली भाषा अशोभनीय असल्याचे पाटील यांनी म्हटले. तसेच, याबाबत 'सामना'च्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. तुम्ही 'सामना'च्या संपादिका आहात, म्हणजे हा अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. ही तुमची भाषा असू शकत नाही. मग अग्रलेखात ही भाषा कशी? असा प्रश्न त्यांना विचारणार आहे,' असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 'डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य' अशा बोचऱ्या शब्दात चंद्रकांत पाटलांवर सामनातून टीका करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...