आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:आज दहावी, बारावी ICSC चा निकाल होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

महाराष्ट्र18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज केंद्रीय मंडळाचा ICSC चा दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहेत. नुकताच बारावी CBSC परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आज ISCS, ISC चा निकाल लागणार आहे.

दहावी बारावी परीक्षांचे निकाल विद्यार्थ्यांना आज दुपारी 3 वाजता मंडळाच्या cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

कोणते निकाल आज लागणार?

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स, (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) (ICSE)आणि आयएससी (बारावी) (ISC) च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.

कसा पहाल निकाल?

दहावी, बारावी परीक्षांचे निकाल विद्यार्थ्यांना CISCE च्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. यात विद्यार्थ्यांना आपला ID आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागणार आहे. त्यानंतर

  • 'Examination' टायटलवर क्लिक करा.
  • मुख्य मेन्यू बारवर ICSE (दहावी) वर्ष 2023 परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी 'ICSE' वर क्लिक करा आणि ISC (बारावी) वर्ष 2023 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी 'ISC' वर क्लिक करा.
  • ICSE / ISC मेन्यूमधून 'Reports' वर क्लिक करा.
  • शाळेच्या निकालाची प्रिंट आउट घेण्यासाठी 'Result Tabulation' वर क्लिक करा
  • निकालाची प्रिंट तपासण्यासाठी 'Comparison Table' वर क्लिक करा.

किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?

देश-विदेशातील विविध परीक्षा केंद्रांवर दहावीची (आयसीएसई) परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली होती.

बारावीची (ISC) परीक्षा 29 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 पर्यंत ही परीक्षा सुरू होती. यावेळी मंडळाकडून सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा अधिकचा वेळ देण्यात आला होता. तर यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला देश-विदेशातील परीक्षा केंद्रांवर सुमारे 2.5 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते.