आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज 100 मृत्यू:पुण्यामध्ये आयसीयू, व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा;बेड न मिळाल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल

सांगली (गणेश जोशी)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक हजार 597 व्हेंटिलेटर, तीन हजार 35 आयसीयू बेड झाले फुल्ल

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनअभावी मृत्यूशी लढत देत आहेत, तर ऑक्सिजन केव्हा उपलब्ध होणार या विवंचनेत रुग्णांचे नातेवाईक ‘ऑक्सिजन’मोडवर गेले आहेत. सांगली शहरात रविवारी व्हेंटिलेटरवर असलेले ऐंशी ते नव्वद रुग्ण आहेत, तर चारशे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे खासगी रुग्णालयालाही त्याचा मोठा फटका बसत आहे.

सांगली शहराला दररोज चाळीस टन ऑक्सिजनची आत्यंतिक गरज असताना सध्या केवळ कसाबसा २५ टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. दररोज ऑक्सिजनच्या मागणीमध्ये मोठी वाढ होत आहे. अशा परिस्थितीही रविवारी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शहरातील काही खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांपैकी ज्या रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज आहे त्यांना अन्य हॉस्पिटलमध्ये हलवण्याच्या सूचना नातेवाइकांना दिल्याने शहरात एकच खळबळ माजली.

गेले काही दिवस सांगली शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर जो अचानकपणे वाढला आहे त्यामागेही ऑक्सिजनची कमतरता हेच कारण असावे, असे एका वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर आपली शंका बोलून दाखवली. दरम्यान, राेजच्या रोज रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

जम्बो कोविड रुग्णालय हाऊसफुल्ल
पुणे शहरात शिवाजीनगर सीओईपी मैदान येथे ७०० बेडचे रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले असून त्या ठिकाणी ही आयसीयू आणि एचडीयु बेडचा तुटवडा जाणवू लागला असून ५२४ बेड वर रुग्ण दाखल आहे, तर बाणेरमधील ३३४ बेडचे जम्बो कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाले असून त्या ठिकाणी एकही बेड शिल्लक नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील ७५० बेड रुग्णालय आणि ऑटोक्लस्टर येथील २०० बेडचे जम्बो कोविड रुग्णालय ही हाऊसफुल्ल झाले आहेत. दुसऱ्या बाजूला दिवसेंदिवस रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन मागणी वाढत असून ती दैनंदिन ४२० मेट्रिक टनपर्यंत पोहोचली आहे. मात्र, पुरवठा केवळ ३५३ मेट्रिक टन होत असल्याचे सांगण्यात आले.

सांगली : ९० रुग्ण व्हेंटिलेटरवर, खासगी रुग्णालयाला फटका
पुणे |
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण पुणे शहरात मागील वर्षी ९ मार्च रोजी सापडला आणि पहिल्या कोरोना लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे जिल्ह्यात राहिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्येमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर असून अत्यवस्थ रुग्णांना आयसीयू, व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा मोठया प्रमाणात जाणवत आहे. वेळेत आयसीयू, व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने रुग्णांचे कुटुंबीय, नातेवाईक हतबल झालेले दिसत असून रुग्णांना जिवानिशी मुकावे लागत आहे.

पुणे जिल्ह्यात आता पर्यंत एकूण आठ लाख १७ हजार ६३३ कोरोना रुग्ण सापडले आले असून सात लाख १० हजार ७८४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, तर १२ हजार ७६२ जणांचा कोविडने मृत्यू झालेला आहे. मात्र, ९४ हजार ७८ रुग्ण अद्याप कोरोना उपचार घेत असून त्यापैकी ६८ टक्के म्हणजेच ६४ हजार ३५७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णालयावरील ताण काही प्रमाणात कमी आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील एक हजार ५९७ व्हेंटिलेटर आणि तीन हजार ३५ आयसीयू बेडपैकी एकही बेड शिल्लक नसल्याने गंभीर रुग्णांना शिल्लक नसल्याने अत्यावश्यक बेडची गरज असलेले रुग्णांचे नातेवाईक विविध रुग्णालयाच्या फेऱ्या मारूनही त्यांचे हाती निराशा येत आहे.

दरदिवशी रुग्णसंख्या सुमारे दहा हजार अशा प्रकारे झपाट्याने वाढत असल्याने आणि १०० ते १५० कोरोना मृत्यू होत असल्याने प्रशासनाचे प्रयत्न कमी पडताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनविरहित ५३ हजार ८६४ बेड निर्माण करण्यात आले असले तरी त्यापैकी १४ हजार ५९० बेडच सध्या रुग्णांनी व्यस्त आहे. तर, १२ हजार ७६४ ऑक्सिजन बेडपैकी १० हजार ५१४ बेड रुग्णांनी व्यापले असल्याने त्याचा ही तुटवडा लवकरच जाणवू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

तातडीने प्लँट उभारणार : जिल्हाधिकारी चौधरी
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, सांगलीतील गंभीर ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्याला ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी एक ऑक्सिजन टँकर सांगलीकडे रवाना केला आहे. तो रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत दाखल होईल. सोमवारी कर्नाटकातील बेल्लारी येथून एक टँकर सांगलीत दाखल होणार आहे. याचबरोबर सांगलीची ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी सांगलीत सहा टन ऑक्सिजनचा प्लँट तातडीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...