आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेचा काँग्रेसवर बाण:'औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला तर त्यात नवीन काय ? औरंगजेब हा सेक्युलर नव्हता- उद्धव ठाकरे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख झाल्याने काँग्रेसने त्याला आक्षेप घेतला आहे. मात्र, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला चांगलेच फटकारले आहे.

मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'संभाजीनगर असा ट्विटर हँडलमध्ये उल्लेख केला तर त्यात नवीन काय ? जे वर्षानुवर्षे बोलतोय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो उल्लेख केला, तेच ट्विटरवर लिहिले. औरंगजेब हा सेक्युलर नव्हता. आघाडीच्या अजेंड्यात सेक्युलर हा शब्द आहे, त्यात औरंगजेब बसत नाही', अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला फटकारले आहे.

बातम्या आणखी आहेत...