आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:डिसेंबरपर्यंत ओबीसी आरक्षण लागू झाले नाही तर राज्यातील मंत्र्यांना जनता गावबंदी करु, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिसेंबरपर्यंत ओबीसी आरक्षण लागू झाले नाही तर राज्यातील मंत्र्यांना महाराष्ट्राची जनता गावबंदी करेल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत दिला आहे. ते अमरावतीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस सरकारने 31 जुलै 2019 ला वटहुकूम काढून ओबीसींचे 27 टक्के आरक्षण वाचवले. त्यानंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुकाही त्या वटहुकूमामुळेच ओबीसींना मिळालेल्या आरक्षणानुसारच झाल्यात. दुर्दैवाने आमचे सरकार जाऊन नवीन सरकार आले आणि तो वटहुकूम रद्द झाला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार न्यायालयात इच्छाशक्ती अभावी ओबीसी आरक्षण वाचवू शकले नाही. मुळातच त्यांना ओबीसी आरक्षण टिकवायचे नसून या आरक्षणाविनाच त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत, असा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

आता 85 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होत आहेत. त्यामुळे डिसेंबरपर्यंत ओबीसी आरक्षण लागू झाले नाही तर राज्यातील मंत्र्यांना महाराष्ट्राची जनता गावबंदी करेल, असा इशाराही बावनकुळे यांनी अमरावतीत दिला.

शिवसेनेचा इतिहास तपासा, हे अनेकांना खालच्या भाषेत बोलले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्धव ठाकरे यांनी जोडे मारण्याची भाषा वापरली होती. देवेंद्र फडणवीसांसंदर्भातही खालच्या दर्जाचे शब्दप्रयोग केले होते. मात्र, आम्ही त्यांच्याविरोधात कुठलेही कृत्य केले नाही. नारायण राणे यांना चक्क जेवणाच्या ताटावरून पोलिसांनी उचलले ही गंभीर बाब होती. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे काही केले नाही. शिवसैनिकांनी आमचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. यापुढे शिवसेनेने आमच्याशी पंगा घेतला तर आम्ही जशास तसे उत्तर देणार, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...