आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये गेलेल्या आणि काही महिन्यातच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या उर्मिला यांच्या प्रवेशावरुन भाजप खासदार प्रितम मुंडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 'उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेचे नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा,' असा टोला मुंडे यांनी शिवसेनेला टोमणा लगावला.
प्रितम मुंडे पुढे म्हणाले की, 'उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माझ्या त्यांनाही शुभेच्छा आहेत. लोकसभेला त्यांनी काँग्रेसकडून नशीब आजमावून पाहिले. आता शिवसेनेत गेल्याने त्यांचे स्वत:चे नशीब किंवा शिवसेनेचे नशीब बदलणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा', असेही प्रितम मुंडे म्हणाल्या.
महाविकास आघाडी सरकारला एकवर्ष पूर्ण झाले.या काळात सर्वच घटकांचे प्रश्न सोडविण्यास सरकारला अपयश आले.राज्यातील समस्या आणि सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणे आमचे कर्तव्य आहे.आज जालना येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडले ( 1/2 )@BJP4Maharashtra pic.twitter.com/3M6YWee4Ml
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) November 30, 2020
'राज्य सरकारची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती'
राज्य सरकारची ही वर्षपूर्ती जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती असल्याचं म्हणत भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. प्रितम मुंडे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. 'कुठल्याच बाबतीत हे सरकार चांगले काम करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती आहे. लवकरच आपल्या कर्माने हे जिथून आले तिथे परत जातील आणि भारतीय जनता पार्टी ही आपल्याला सत्तास्थानी दिसेल', असा विश्वास प्रितम मुंडे यांनी बोलून दाखवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.