आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठा दावा:महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले नसते तर जयंत पाटील भाजपमध्ये आले असते'- नारायण राणे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राणेंचे पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर

'शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले नसते तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील भाजपमध्ये आले असते', असा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी 'गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचे नसते. नारायण राणेंच्या टीकेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही', अशी टीका केली होती. जयंत पाटलांच्या या टीकेला उत्तर देताना राणे म्हणाले की, 'महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले नसते तर, जयंत पाटील भाजपमध्ये आले असते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार आहे,' असे नारायण राणे म्हणाले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser