आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:'...जर 'ती' कागदपत्रे खोटी निघाली तर माझ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करा, मी कारवाईसाठी तयार आहे'-किरीट सोमय्या

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू झाल्यापासून भाजप नेते किरीट सोमय्या ठाकरे कुटुंबावर आरोप करत आहेत. उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, 'ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचे श्रीखंड करण्यात गुंतलेले सरकार आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावे. जी जमीन 2 कोटी 55 लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली होती, ती 900 कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील 354 कोटी आधीच देण्यात आलेले आहेत.'

'दहिसर भूखंड घोटाळ्याची कागदपत्र आमच्याकडे आहेत. आम्ही जमीन घोटाळ्याची कागदपत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोपवली होती. या घोटाळ्याप्रकरणी आम्ही राज्यपालांकडे तक्रार दाखल केली होती. यांतर राज्यपालांकडून लोकायुक्तांना चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. शिवसेनेत हिंमत नाही म्हणून ते विषय वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी 40 जमिनी खरेदी केल्यात हे या कागदपत्रांवरून दिसत आहे. त्यातील 30 जमिनींच्या सातबारावर अन्वय नाईक कुटुंबियांचे नाव आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला.' सोमय्या पुढे म्हणाले की, 'दहिसर भूखंड घोटाळ्याची सादर केलेली कागदपत्रे खरी आहेत. जर कागदपत्र खोटी निघाली तर माझ्या विरोधात पोलिसांत जा. मी कारवाईसाठी तयार आहे. पुराव्यांशिवाय मी बोलत नाही, हेच मला शिवसेनेच्या नेत्यांना सांगायचे आहे. तुमच्यामध्ये उत्तरे देण्याची हिंमतच नाही, म्हणूनच ते शिवीगाळ करतात," असेही किरीट सोमय्या म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...