आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समिती:हिंमत असेल तर भांगरे यांच्या केसाला धक्का लावून दाखवा

अकोलेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकल्प कार्यालय समितीच्या माजी अध्यक्ष सुनीता भांगरे यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तालुक्यातून खळबळ उडाली. याचा सर्वजण निषेध करीत आहेत. अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला आव्हान देत हिंमत असेल, तर त्यांच्या केसाला धक्का लावून दाखवा, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला.

मेंगाळ म्हणाले, सुनीता भांगरे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नेतृत्व करीत आहेत. प्रकल्प कार्यालय समितीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सक्षमपणे सांभाळली. काही दिवसापूर्वी मुतखेल आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत आवाज उठवला. प्रशासनावर अंकुश ठेवणे, प्रश्नांची सोडवणूक करणे ही लोकप्रतिनिधींचे कामे आहेत. यावरून कोणी धमकावत असेल, तर ते सहन करणार नाही, असा इशारा मारुती मेंगाळ यांनी दिला.