आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बिबट्याच्या जबड्यातून मातेने मुलास वाचवले, पोटचा गोळा बिबट्याने पकडल्याचे दिसताच आईने घेतली झेप

घोटी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्यातील फोडशेवाडी येथे बुधवारी सायंकाळी बिबट्याने एका सहा वर्षीय मुलावर झडप घालून जबड्यात पकडले. परंतु, या चिमुकल्याच्या आईने जिवाची पर्वा न करता धावत, आरडाओरड करत बिबट्यावर झेप घेतली आणि पोटच्या मुलाचे प्राण वाचवले. कार्तिक काळू घारे असे या मुलाचे नाव असून नाशिक जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरेवाडी येथे सोमवारी याच बिबट्याने एका दहा वर्षीय मुलाचा बळी घेतला होता.

इगतपुरीत दोन वर्षांत ७ ठार, गतवर्षी १० बिबटे जेरबंद
गतवर्षी बिबट्याच्या हल्ल्यात इगतपुरी तालुक्यातील आधरवड येथे दहा वर्षीय मुलगा, पिंपळगाव मोर येथे अकरा वर्षीय मुलगी, कुरुंगवाडी येथे ८० वर्षांची वृद्धा तर चिंचलखैरे येथे १० वर्षीय मुलगा असे चार जण ठार झाले तर दोन ते तीन जखमी झाले. याच कालावधीत वन विभागाने दहा बिबटे जेरबंद केले. यंदा आतापर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला असून यात दरेवाडी येथील १० वर्षीय मुलाचा, खैरगाव येथील ८० वर्षांची वृद्ध महिलेचा तर खेड येथील एका १० वर्षीय मुलीचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यातील फोडशेवाडी येथील घटना, जंगल व धरण क्षेत्रामुळे बिबट्यांचा वावर काळुस्ते परिसरात घनदाट जंगल व धरण क्षेत्रामुळे या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणी वीज नसल्याने अंधारामुळे हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. - डी. जी. घारे, माजी ग्रामपंचायत सदस्य, फोडशेवाडी

बिबट्याचे लहान मुलांवरच हल्ले का?
इगतपुरी तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढत असून यात सहा ते अकरा वर्षांतील मुले अधिक जखमी होत आहेत. बिबट्या आपल्या उंचीइतक्या व्यक्तींवर हल्ला करतो, हे त्यामागील कारण असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...