आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण सुनावणी:मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं हे आज कळू शकणार आहे. मागच्या वेळी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. मात्र सोबतच हा अंतरिम निर्णय असून याचं भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल असंही सांगण्यात आलं होतं. 

मराठा आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांची मूळ याचिका आहे. मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावं अशी मागणी केली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी (मराठा समाज) शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण लागू करण्याकरिता विधिमंडळाने विधेयक संमत केले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे होते. आथा सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.  यासोबतच यावर्षीची पदव्युत्तर मेडिकल अभ्यासक्रमाची प्रक्रिया 30 जुलैपर्यंत संपणार आहे. त्यामुळे यावेळी सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

दरम्यान 1 डिसेंबर 2018 पासून राज्यात मराठा आरक्षण विधेयक लागू करण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद मराठा आरक्षण विधेयकात केली होती. यामध्ये ओबीसी समाजाला कोणताही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं. 

0