आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:जमिनीच्या वादातून पारधी महिलेला झोपडीसह जाळले, महिलेचा जागीच मृत्यू

सातारा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंप्रद (ता. फलटण) येथे जमिनीच्या वादातून पारधी समाजातील महिलेला वादग्रस्त जागेतील झोपडीसह जाळल्याची धक्कादायक घटना घडली असून यामध्ये संबंधित जळीत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी कल्पना अशोक पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. फिर्यादी महिलेचे सासरे झबझब पवार यांनी सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी पिंप्रद (ता.फलटण) येथे प्रल्हाद गोरख मोरे यांची गट नं.३ मधील २५ गुंठे जमीन खरेदी केली होती. मात्र सदरची जमीन प्रल्हाद मोरे व त्यांचे नातेवाईक फिर्यादीच्या कुटुंबाला वहिवाट देत नसल्याने प्रल्हाद मोरे यांचा मुलगा राजू प्रल्हाद मोरे याच्यासोबत जमिनीवरून वादविवाद होता. दि. १० फेब्रुवारी रोजी फिर्यादी कल्पना पवार आपली मुलगी रोशनी, काजल, सून मातेश्री, नणंद महुली ऊर्फ मौली हे संबंधित जागेत गेले आणि त्यांनी पुन्हा झोपडी उभारली व त्याच ठिकाणी स्वयंपाक करून त्यांनी रात्रीचे जेवण केले. रात्री ११ च्या सुमारास कुंडलिक कृष्णा भगत, सतीश भगत, राजू प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे व सुनील मोरे या पाच संशयितांनी जणांनी हातात दांडगे घेऊन फिर्यादी व सोबतच्या कुटुंबीयांवर अचानक हल्ला चढवला. त्यावेळी फिर्यादीची नणंद महुली ऊर्फ मौली या झोपडीमध्ये झोपलेल्या होत्या. सदर आरोपींनी यावेळी झोपडी पेटवून दिली आणि त्यामध्ये झोपडीत झोपलेल्या महुली यांचा भाजून जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...