आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • In Chandrapur, 7 Members Of A Family Were Tied With Ropes In Bhar Chowk On Charges Of Witchcraft And 5 Others, Including The Elderly, Were Seriously Injured.

महाराष्ट्रातील तालिबानी:चंद्रपुरात जादूटोण्याच्या आरोपावरून एका कुटुंबातील 7 जणांना भर चौकात दोरीने बांधून केली मारहाण, वृद्धांसह 5 जण गंभीर

चंद्रपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपुरात जादूटोणा केल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी 7 लोकांना दोरीने बांधून भर चौकात बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला उघडकीस आला आहे. यामध्ये 4 महिला आणि 3 वृद्ध आहेत. वृद्धांसह 5 जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी, घटनेचे फोटो समोर आल्यानंतर पोलिसांनी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही मारहाणीची घटना तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील वाणी खुर्द गावात घडली आहे. ग्रामस्थांनी शनिवारी या कुटुंबाला भर चौकात बांधून मारहाण केली. संपूर्ण कुटुंब स्वत:ला सोडण्याची विनंती करत होते. मात्र कुणीही त्यांच्या मदतीने पुढे गेले नाही.

या घटनेनंतर गावात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. कडक चौकशी केल्यानंतरच गावात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटनेशी संबंधित काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गावात पोहोचून अंधश्रद्धेविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांनी सांगितले की, शनिवारी वणी गावात घडलेल्या घटनेनंतर शांतता व सुव्यवस्थेबाबत गावाचे सरपंच आणि पोलीस पथकासोबत बैठक झाली. आम्ही गावात पुरेशी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. सध्या सर्व आरोपी फरार असून त्यांना लवकरच अटक केली जाईल. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी काही उच्च पोलीस अधिकारी आज गावाला भेट देतील.

दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही तत्वांकडून केला जात असला तरीही प्रत्यक्षात तसे चित्र नाही. आमचे प्रतिनिधी हेमंत दोरलीकर यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता यात जादुटोण्याचा प्रकार असल्याची शक्यता आहे. पण, जातीभेद किंवा तसा काहीही प्रकार दिसून आलेला नाही. पोलिस याबाबत सविस्तर माहिती माध्यमांना देणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...