आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण:राज्यातील पाच विद्यापीठांमध्ये सॅटेलाईट सेंटर सुरु करून त्याद्वारे व्हर्च्यूअल क्लासरुमची संकल्पना पुढे आणणार- उदय सामंत

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील पाच विद्यापीठांमधून उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे सॅटेलाईट सेंटर सुरु केले जाणार आहे. त्याद्वारे व्हर्च्यूअल क्लासरुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राचार्य व प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पुढील काळात पारंपरिक शिक्षण पद्धतीसोबतच व्हर्च्यूअल क्लासरुमची संकल्पना पुढे आणली जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

हिंगोली येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार संतोष बांगर, नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर, प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. गोपाल कदम, विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी उपस्थित होते.

यावेळी सामंत म्हणाले की, पारंपरिक शिक्षण पद्धतीवरच आमचा विश्‍वास आहे. जोपर्यंत प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यात समोरासमोर संवाद होणार नाही, तोपर्यंत महाविद्यालये सुरु झाले असे म्हणता येईल. मात्र कोविडमुळे ऑनलाईनचा पर्यांय देण्यात आला आहे. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय जाणीवपुर्वक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र ऑनलाईन प्रगत शैक्षणिक सुविधा असलीच पाहिजे. त्यासाठी पुढील काळात पारंपारीक शिक्षणासोबतच व्हर्च्यूअल क्लासरुमची संकल्पना पुढे आणली जाणार आहे. यासाठी गोंडवाणा, पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपुर या विद्यापीठात सॅटेलाईट सेंटर सुरु केले जाणार आहे. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राचार्य व प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

राज्यात प्राध्यापकांच्या रिक्तपदांबाबत बोलताना सामंत म्हणाले की, राज्यात ४६०० प्राध्यापकांच्या जागा भरण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी १६०० जागा कोविडपुर्वी भरण्यात आल्या आहेत. त्यानंतर ३०७४ प्राध्यापकांच्या जागा भरण्यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र कोविडमुळे वित्त विभागाकडून याबाबत निर्णय झाला नाही. कोविड कमी झाल्यानंतर या जागा भरल्या जातील असे त्यांनी सांगितले.

राज्यात शैक्षणिक सुविधा वाढविणार असून त्या तुलनेत प्राध्यापकवर्ग देखील वाढविला जाणार आहे. त्यातून शिक्षणाचा स्तर वाढला पाहिजे यावर महाविकास आघाडीचे सरकार काम करीत असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

आमदार संतोष बांगर यांच्या कामाचे कौतूक

हिंगोली जिल्ह्यात कोविडमध्ये रुग्णांना इंजेक्शन व इतर सुविधा मिळण्यासाठी ९० लाख रुपयांची एफडी मोडणाऱ्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या कामाचे त्यांनी कौतूक करून प्रशासन व शासनाच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...