आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्हयात मागील चोविस तासात पावसाने दाणादाण उडवली असून मंगळवारी ता. ७ सकाळी आठ वाजेपर्यंत ३० पैकी २० मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाले भरून वाहू लागले असून आता पिके नुकसानीच्या पातळीवर पोहोचले आहेत. यावर्षी मान्सून कालावधीत आता पर्यंत १०५ टक्के पाऊस झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील महिन्यापर्यंत २१ दिवसांच्या उघडीपीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांत पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. तर मागील चोविस तासात जिल्हयातील ३० पैकी २० मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नदी, नाल्यांना पुर आल्याने पुराचे पाणी परिसरातील शेतात शिरले आहे. त्याचा फटका आता पिकांना बसू लागला आहे. तर पावसाचा अंदाज आणखी दोन दिवस कायम असल्याने पिके नुकसानीच्या पातळीवर पोहोचल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये नर्सी नामदेव मंडळात ७८ मिलीमिटर पाऊस झाला आहे. सिरसम ८०.०३, डिग्रस कऱ्हाळे ६८, माळहिवरा ८२, खांबाळा ७५.३, वाकोडी ६७.८, आखाडा बाळापूर ९१.८, डोंगरकडा १०८.८, वारंगाफाटा १३१, वसमत ६७.८, आंबा ७९.५, हयातनगर ६७.३, गिरगाव ७२.३, हट्टा ६६.५, टेंभूर्णी ७६, कुरुंदा ८६, वसमत ७३.६, औंढा नागनाथ ९२.८, येहळेगाव ६८.३, साळणा ६९.५ तर जवळा बाजार मंडळामाध्ये ७९.८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, जून ते सप्टेंबरच्या मान्सून कालावधीत आता पर्यंत १०५ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मागील चोविस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण पाऊस पुढील प्रमाणे ः हिंगोली ७२ मिलीमिटर (८४३ मिलीमिटर), कळमनुरी ८१.३० (९१७), वसमत ७३.६० (७९५), औंढा नागनाथ ७७.६० (९५२) तर सेनगाव तालुक्यात २७.९० मिलमिटर (७२२ मिलीमिटर) पावसाची नोंद झाली आहे.
नुकसानीचा अहवाल सादर करा : जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी हिंगोली
जिल्हयात मागील चोविस तासात झालेल्या अतिवृष्टी भागामधे तातडीने पाहणी करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या सुचना तहसील व मंडळ अधिकारी व तलाठी यांना देण्यात आल्या आहेत. त्या अहवालानंतर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर केला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.