आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • In Maharashtra, BJP Should Form A Grand Alliance With NCP And RPI, While Sharad Pawar Should Join NDM, Union Minister Ramdas Athawale Invites

पवारांना निमंत्रण:महाराष्ट्रात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय अशी महायुती व्हावी, तर शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं, केंद्रीय मंत्र्यांचं निमंत्रण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 'एनडीए'त सामील होण्याचे निमंत्रण दिलं आहे. रामदास आठवले यांनी पवारांना शिवसेना सोडून भाजप या असं म्हटलं आहे. महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती व्हावी, अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करत आपलं मत मांडल आहे. 

या व्हिडिओमध्ये रामदास आठवले म्हणाले की, 'शरद पवार यांनी एनडीएसोबत यावे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करायला हवं. शरद पवार यांच्या अनुभवाचा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदा होऊ शकतो. शिवसेनेला पाठिंबा देऊन राष्ट्रवादीचा काहीच फायदा नाही. त्यामुळे शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक असल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. 

राज्यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती तयार झाली तर ही महायुती प्रचंड शक्तीशाली असेल असा विश्वसाही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा अस मत आठवलेंनी व्यक्त केलं. तसेच हे माझं वैयक्तिक मत असल्याचंही आठवलेंनी स्पष्ट केलं आहे. 

0