आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर तालुक्यातील घटना:​​​​​​​मानेवाडीत पिकअप अंगावर घालून मेहुण्याने केला भाऊजीचा खून; तिघांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रमेश तुकाराम हाके, तुकाराम हाके, भाऊराव उर्फ दादा हाके (सर्व रा. मानेवाडी ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

बहिणीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून मेहुण्याने भाऊजीच्या अंगावर चारचाकी वाहन घालून खून केल्याची घटना मानेवाडी (ता. तुळजापूर) येथे ५ मे रोजी दुपारी घडली. रमेश हाके याने पिकअप वाहन (एम.एच.१३ एएन ४२३९) सिद्राम उर्फ सिधू वसंतराव बर्वे (३२, रा. मानेवाडी ता. तुळजापूर) यांच्या अंगावरुन चालवून त्यांचा खून केला. सिद्राम बर्वे यांचे वडिल वसंतराव रावसाहेब बर्वे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पाेलिसात गुन्हा नोंदविण्यात अाला आहे. रमेश तुकाराम हाके, तुकाराम हाके, भाऊराव उर्फ दादा हाके (सर्व रा. मानेवाडी ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

सिद्राम उर्फ सिधूचे लग्न ८ वर्षापूर्वी बालीका तुकाराम हाके हिच्यासोबत झाले असून, त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. बर्वे कुटूंबीय मानेवाडी शेतात राहतो. सिद्राम उर्फ सिधू हा ट्रॅक्टर चालवतो व शेती व्यवसाय करतो. सिद्राम व सून बालीका यांच्यात नेहमी कौटुंबिक कारणामुळे किरकोळ वाद होत होते. यापूर्वी यांच्यात झालेल्या वादावरुन दोन तीन वेळा बालीका हिला तिच्या आई वडील व भाऊ माहेरी घेऊन गेले होते. बर्वे कुटुंब सुनेच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढून नांदविण्यासाठी आणले हाेते. दरम्यान वसंतराव बर्वे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी माझी सून बालीका व मुलगा सिधू यांच्यात किरकोळ घरगुती कारणावरुन वाद झाला होता.

बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास माझी सून बालीका हिचा भाऊ रमेश हाके त्याचे‍ वडिल तुकाराम हाके त्याचा भाऊ भाऊराव हाके असे त्यांची पिकअप गाडी घेऊन शेतातील घरी आले. दुपारी सव्वातीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान माझी सून बालीका हिला घेऊन परत त्याच्या घरी निघाले. त्यांना समजावून सांगण्यासाठी घराच्या अलीकडे शेताच्या रस्त्यावर मी स्वत: सोबत माझा मुलगा‍ सिद्राम, माझा मेव्हणा नरहरी गडदे,मामाचा मुलगा राम भागवत माने, आमचे शेतशेजारी रंगनाथ सुभाष हाके थांबलो होतो. त्यांनी गाडी थांबवावी म्हणून माझा मुलगा सिद्राम याने रस्त्यामध्ये दगड टाकले होते. परंतु रमेश हाकेने सिद्राम यास जोराची धडक देऊन त्याच्या अंगावर पिकअप वाहन घातले.

बातम्या आणखी आहेत...