आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध दरवाढीसाठी आंदोलन:काही ठिकाणी दूध रस्त्यावर तर काही शेतकऱ्यांनी दूधाने अंघोळ करत केले आंदोलन, पुण्यातील आंदोलनात चंद्रकांत पाटीलही सहभागी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दूध उत्पादक संघर्ष समितीकडून हे आंदोलन करण्यात आले
  • भाजप आणि मनसे कार्यकर्तेही ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे समर्थन करत रस्त्यावर उतरले

शनिवारी सकाळपासून राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अकोला, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी दूध सांडून देण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी टायर जाळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

दूध उत्पादक संघर्ष समितीने या आंदोलनाची घोषणा केली होती. दरम्यान यामध्ये भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण कार्यकर्त्यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवित विविध ठिकाणी निषेध नोंदविला आहे.

सरकारसोबत बातचित करुनही कोणताही निर्णय न झाल्याने सुरू आहे आंदोलन
यापूर्वीही शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात 2 महिने प्रदर्शन केले होते. तसेच अनेक ठिकाणी दूध सांडले होते. तीन दिवसांपूर्वी सरकारने लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत एक बैठक घेतली. मात्र यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. यानंतर 1 ऑगस्टला आंदोलन केले जाईल असे आंदोलकांनी सांगितले होते. त्यानुसार हे आंदोलन केले जात आहे.

पुण्यात शेतकऱ्यांना भाजपाने पाठिंबा दिला. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हातात पोस्टर पकडून कार्यकर्त्यांसोबत आंदोलनात सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी पुणे-मुंबई हायवेला काही काळ जाम केले होते.

बातम्या आणखी आहेत...