आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बिबट्याचा वावर:तळोदा शहरात बिबट्याच्या वावर, कुत्र्यामागे धावताना बिबट्या सीसीटीव्हीत कैद

तळोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

महाराष्ट्र्र व गुजरात राज्याचा सीमेवर असणाऱ्या तळोदा शहराच्या हद्दीजवळ किंबहुना शहर हद्दीत बिबट्या येऊन ठेपला आहे. यामुळे शहरात एकच दहशत पसरली आहे.

तळोदा शहादा रस्त्यावर अमरधाम जवळ असणाऱ्या गॅरेजवर बिबट्या रात्री तीन वाजेच्या सुमारास कुत्र्याच्या मागे धावताना सीसीटीव्हीत कैद झाला. यामुळे हा बिबट्या तळोदा शहरातील शहादा रस्ता लगत असणाऱ्या वसाहतींमध्ये कधीही शिरण्याची शकत्या नाकारता येत नाही.

सकाळी  संध्याकाळी फिरणाऱ्या साठी  सतर्क राहणे आवश्यक 

तळोदा शहादा रस्त्यावर आदिवासी प्रकल्प कार्यालय ते बहुरूपा रस्त्या पावेतो वन विभागाचे क्षेत्र असून या भागात तीन नाले आहेत. याच मार्गावरून अनेकदा बिबट जाताना अनेकांनी रात्री पाहिले आहे. तर, हॉटेल सदभावना समोरील नितीन वाणी यांच्या क्षेत्रात दोन कुत्रे  काही दिवसांपूर्वी फस्त करून दिवसा पाळीव कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने वन विभागाने इथे पिंजरा लावला होता. मात्र, उपयोग झाला नाही 

गुजरात राज्यातील बहुरपा या गावा शेजारून तापी नदीकडे एक नाला जातो. हा नाला सातपुडाच्या पायथ्याशी आहे. यातून शेत शिवारातील पावसाचे पाणी वाहते. हे नाल्याचे पाणी वन विभागाच्या लागून वाहणाऱ्या नाल्यातून गुजरात राज्य हद्दीतून तापी नदीजवळ संपतो. मात्र सातपुडा पर्वताजवळ प्रजन्यवृष्टी झाली तरच  नाला खळखून वाहतो. अन्यथा पावसाळ्यात ही काही पाणथळ जागा सोडल्यास कोरडाच असतो. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात काटेरी  झुडपे वाढलेली असून  दिवसा देखील हा भाग निर्जन असतो. त्यामुळे गुजरात व महाराष्ट्र्र राज्याचा सीमेवर हा बिबट्या फिरत असून  निश्चितच शहराचा नवीन वसाहती साठी हे धोक्याचे संकेत आहेत. गुजरात वन विभागाने बिबट पकडण्यासाठी  तीन वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावले असून   या पिंजऱ्यात  अजूनही बिबट्याला जेरबंद करण्यास यश आलेले नाही.

Advertisement
0