आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सांगली येथे गुरुवारी भाजपच्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी रयत संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खरमरीत टीका केली. 'शरद पवारांचे मनावर घेऊ नका, ते जे बोलतात त्याच्या उलटे करतात', असे सदाभाऊ खोत म्हणाले. यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार उपस्थित होते.
यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, 'शरद पवारांनी जर म्हंटले की सूर्य उद्यापासून पूर्वेकडे उगवणार, तर सूर्य पश्चिमेकडे उगवणार. पवारांचे आत्मचरित्र वाचावे की नाही असा प्रश्न पडला आहे. कारण, पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रमध्ये म्हटलंय की मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, अडत असो वा हमाली ही शेतकऱ्यांकडून घेतली नाही पाहिजे. कुणालाही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करता आला पाहिजे. आता दुसरीकडे हेच पवार म्हणतात माझा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे,' अशी टीका खोत यांनी केली. तसेच, 'महाराष्ट्राचा इतिहास लिहला जाईल त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटले जाईल,' असा घणाघातही खोत यांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.